OFFICIALS MET

महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत सांगली येथील बचत गटातील महिलांनी सुरु केलेल्या लोकसंचलीत साधन केंद्रास सामाजिक न्याय विभागाचे मा.प्रधान सचिव श्री. उज्ज्वल उके साहेब व विविध महामंडळांचे अधिकारी यांची भेट

दिनांक २७/८/२०१५ रोजी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव मा. श्री. उज्ज्वल उके साहेब व त्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या विविध महामंडळांचे अधिकारी – महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक मा. श्री. बेद साहेब, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मा.श्री. शरद लोंढे साहेब, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक मा.श्री. रमेश बनसोड साहेब, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळचे महाव्यवस्थापक, मा. श्री. नंदकुमार फुले, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मा.श्री. यशवंत मोरे साहेब व “माविम”च्या उपाध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती कुसुम बाळसराफ यांनी भाग्योदय लोकसंचालीत साधन केंद्रास (शिराळा, जि.सांगली) भेट देऊन पाहणी केली.

शिराळा विश्रामगृह येथे मा. श्री. उज्ज्वल उके साहेब, प्रधान सचिव यांच्या सोबत चर्चा करीत असताना भाग्योदय लोकसंचालीत साधन केंद्रातील कार्यकारणीच्या महिला

यावेळी मा. प्रधान सचिव श्री. उज्ज्वल उके साहेबांनी महामंडळांच्या माध्यमातून देण्यात येणारे अनुदान किंवा कर्ज बचतगटांच्या माध्यमातून गरीब आणि गरजू महिलांना वितरीत करण्याचा मानस व्यक्त केला तसेच माविमच्या शिराळा येथील भाग्योदय लोकसंचालीत साधन केंद्राच्या कार्यकारणी सोबत घेतली. सदर बैठकीत मा. प्रधान सचिव व इतर महामंडळांच्या अधिकार्यांनी महिलांसोबत चर्चा केली व महिलांनी आजपर्यंत बचत गटाच्या माध्यमातून कोणते कार्यक्रम व उद्योग व्यवसाय केले याबाबतची माहिती घेतली. त्यानंतर प्रधान सचिवानी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले व महिलांच्या अडचणी समजून घेतल्या. पुढे मा. प्रधान सचिव व इतर अधिकार्यांनी सागाव येथील महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरु केलेल्या दुध संकलन केंद्रास भेट दिली.

शिराळा तालुक्यातील सागाव येथे बचत गटातील महिलांना मार्गदर्शन करताना मा.प्रधान सचिव श्री. उज्ज्वल उके साहेब, माविमच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्रीमती कुसुम बाळसराफ व इतर महामंडळाचे अधिकारी

“माविम”च्या बचत गटातील महिलांचा उत्साह व त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून केलेले विविध उपक्रम पाहून सर्व महामंडळाचे व्यवस्थापक व महाव्यवस्थापक यांनी बचत गटातील महिलांना सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगितले.

सागाव येथील दुध संकलन केंद्राबाबतची माहिती मा. प्रधान सचिव यांना देताना बचत गटातील महिला

Our Products

 

Donors