CMRC च्या राज्यस्तरीय सुकाणू परिषदेची कार्यकारणी निवडण्यात आली

दि. २६.०४.१७ रोजी माननीय श्रीमती इंद्रा मालो (भा.प्र.से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थीतीमध्ये CMRC च्या राज्यस्तरीय सुकाणू परिषदेची कार्यकारणी निवडण्यात आली. सदर निवड राज्यातील CMRC च्या अध्यक्षांकडून करण्यात आली.

 

महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) महाराष्ट्र शासन व आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी सहाय्यीत (IFAD) तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत सन २०१० मध्ये स्वयंसहाय्य बचत गटांच्या फेडरेशनची निर्मिती केली. ही फेडरेशन्स त्रिस्तरीय फेडरेशन्स आहे. त्यामध्ये स्वयंसहाय्य बचत गट, गाव समिती आणि क्लस्टर लेवल फेडरेशन अशी रचना आहे. सन २०१० ते १७ या कालावधीमध्ये या फेडरेशनला शाश्वत विकासाचा अजेंडा देऊन सक्षम करण्यात आले. महाराष्ट्रात ३०० CMRC ची स्थापना करून त्यांना बळकट करण्यात आले. सर्व CMRC आपल्या बचत गटातील सभासदांना उपजीविका विकासाच्या अनेक सेवा उपलब्ध करून देत आहेत. तसेच बँकेमार्फत पतपुरवठा करत आहेत. परिणामी महामंडळाने ९२,२७२ स्वयंसहाय्य बचत गटांच्या माध्यमातून ११ लाख महिलांना संघटीत केले आहे. या महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय परिषदांची निर्मिती करण्यात आली. राज्यस्तरावर निवडून आलेल्या प्रतिनिधींची नावे खालीलप्रमाणे

अनु. क्र.

विभाग

जिल्हा

राज्यस्तरीय सुकाणू परिषदेची कार्यकारणी

कोंकण विभाग

ठाणे

i) श्रीमती माया आढाव

सिंधुदुर्ग

ii) श्रीमती उदयमती देसाई

औरंगाबाद

लातूर

i) श्रीमती संजीवनी कांबळे

बीड

ii) श्रीमती रेखा वेडे

पुणे

कोल्हापूर

i) श्रीमती शारदा गवंडी

पुणे

ii) श्रीमती चंदन शिंदे

.

नागपूर

भंडारा

i) श्रीमती कुंदा राखडे

वर्धा

ii) श्रीमती शारदा ढोले

अमरावती

यवतमाळ

i) श्रीमती रंजना वाढवे

वाशीम

ii) श्रीमती स्वार्था कालावे

नाशिक

अहमदनगर

i) श्रीमती राजश्री डोंगे

ii) श्रीमती ज्योती झाल्टे

विशेष सदस्य

अमरावती

यवतमाळ

श्रीमती अनिता रामराव घनकर

औरंगाबाद

उस्मानाबाद

श्रीमती चारुशीला प्रशांत पाटील

नाशिक

नाशिक

श्रीमती सुरेखा संजय सांगळे

या व्यतिरिक्त या समितीमध्ये महाराष्ट्रातील नामांकित स्वयंसेवी संस्थेतील प्रतिनिधी, उपजीविका विकास तज्ञ व सूक्ष्म पतपुरवठा सेवा तज्ञ यांचा समावेश राहील. या समितीचे पदसिद्ध निमंत्रक म्हणून माविम, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक हया राहतील व पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून माविम, महाव्यवस्थापक (प्रकल्प) या काम पाहतील.

Our Products

 

Donors